
अभियंत्यांच्या पारदर्शक निवडप्रक्रियेची माजी नगरसेवक इनायत मुकादम यांची मागणी
नियम धाब्यावर बसवून येथील नगर परिषदेत ठेकेदारी अभियंते घेतले जात आहेत. काहींना १० ते १२ वर्षे झाली आहेत. त्यामुळे साहजिकच त्यांचे ठेकेदारांशी हितसंबंध निर्माण झाले असून त्याचा परिणाम शहरातील विकासकामांच्या दर्जावर होत आहे. तसेच गैरव्यवहारही सुरू असून त्यात नगर परिषदेचे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप करत माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी जिल्हाधिकारी एम. देवेंदरसिंह यांच्याकडे तक्रार केली असून चौकशी करण्याची मागणी केली आहे.या तक्रारीत मुकादम यांनी म्हटले आहे की, शहर झपाट्याने विकसित होत असताना विकासकांमध्ये अडथळा व दिरंगाई होवू नये म्हणून विकास कामांवर देखरेख ठेवण्यासह अन्य कामे करण्याकरिता वार्षिक ठेका पद्धतीने सेवा तत्वावर खाजगी अभियंते नियुक्त केले जातात. दरवर्षी नवीन अभियंते पुरविण्यासाठी नगर परिषद वार्षिक कालावधीसाठी निविदा प्रसिद्ध करते. पात्र निविदा धारकांकडून सेवा तत्वांवर तीन अभियंते घेतले जातात, असे असताना मागील काही वर्षाचा विचार करता अभियंते पुरवणारे ठेकेदार बदलले तरी पूर्वी काम करणार्या अभियंत्यांचीच नव्याने नियुक्ती केली जात असल्याचे दिसून येत आहे. www.konkantoday.com