मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगाव जवळ सोमवारी (ता. 5) मध्यरात्री बाराच्या सुमारास एका ट्रकला भीषण आग लागली. ही आग इतकी भीषण होती की ती विझवण्यासाठी अग्निशमन दल व स्थानिकांना तब्बल साडेपाच तास लागले.महाड वरून दहिसरला स्टेनलेस स्टील फिल्टर घेऊन जाणारा ट्रक (MH.04.MH.5693) माणगाव ते इंदापूरच्या दरम्यान माणगावपासून एक किलोमीटरच्या अंतरावर असताना ट्रकमधील असलेल्या साहित्याला अचानकपणे आग लागली. प्रसंगावधान राखत चालकाने ट्रकला रस्त्याच्या बाजूला उभे केले व तेथील स्थानिक नागरिकांनी माणगाव अग्निशमन दलाला व पोलीस प्रशासन यांना संपर्क साधला.

माणगाव अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली परंतु ट्रकमध्ये साहित्य ज्वलनशील असल्याने आग विझवण्यात अडथळे निर्माण होत होते. तसेच आग अतिशय भीषण असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अपयश येत होते. त्यासोबतच धाटाव अग्निशमन दल व सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था मदतीसाठी घटनास्थळी पोहोचले.रात्री साडेबारा वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले. ते सकाळी पहाटे पावणे सहाच्या दरम्यान आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button