संगमेश्वर रेल्वेस्थानकाकडे जाणार्या रस्त्याची दुरवस्था
संगमेश्वर रेल्वेस्थानकाकडे जाणार्या रस्त्याची दुरवस्था झाली असून प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. रस्त्याच्या मध्येच पडलेल्या खड्ड्यांमुळे हा मार्ग धोकादायक बनलेला आहे. संगमेश्वर रेल्वेस्थानक हे मध्यवर्ती ठिकाण आहे. पुणे, मुंबई, गोव्याकडे जाण्यासाठी अनेक प्रवासी या ठिकाणी येत असतात. मात्र रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याने रिक्षा, दुचाकी आणि इतर वाहनांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे रस्त्याची दुरावस्था दूर करण्यात यावी अशी मागणी होत आहे.www.konkantoday.com