संगमेश्वर बाजारपेठेत रस्त्यावरील अतिक्रमणामुळे होतेय वाहतूक कोंडी
संगमेश्वर आठवडा बाजारात व्यापारी रस्त्याच्या दोन्ही बाजूला मालविक्री सामान घेवून बसत असल्याने या रस्त्यावरून वाहने सोडाच पायी चालणेही अक्षरशः तारेवरची कसरतच ठरत आहे. यामुळे अनेकदा रस्त्यावर ठाण मांडून वाहतुकीस व पादचार्यांसाठी अडथळा निर्माण करणारे व्यापारीच चालक व पादचार्यांबरोबर वादावादी करत असल्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. www.konkantoday.com