सॅटेलाइट टॅगिंग केलेल्या कासवांपैकी ‘प्रथमा’ने गुजरातचा किनारा गाठला

समुद्री कासवांच्या अभ्यासासाठी सॅटेलाइट टॅगिंग केलेल्या कासवांपैकी ‘प्रथमा’ने गुजरातचा किनारा गाठला आहे. या कासवाने सर्वाधिक ३३० किलोमीटरचा प्रवास केला आहे; तर सावनी आणि वनश्री यांनी रेवा कासवाच्या दिशेने आणखी दक्षिणेकडे म्हणजेच कर्नाटकच्या दिशेने जाण्यास सुरुवात केली आहे.रेवा सातत्याने दक्षिणेकडे सरकत असून, ते कारवारपासून ४०, तर मंगळूरपासून ८० किलोमीटर अंतरावर आहे.

कोकण किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी येणाऱ्‍या ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांचे संवर्धन करून अभ्यास करण्यासाठी वनविभागाच्या ‘कांदळवन प्रतिष्ठान’कडून पावले उचलण्यात आली आहेत. गेल्या तीन महिन्यांत पाच कासवे सोडण्यात आली. त्यातील लक्ष्मी हे कासव महिन्याभरातच संपर्काबाहेर गेले; तर उर्वरित चार कासवांची सद्यःस्थितीवर कांदळवन विभागाचे सागरी जीवशास्त्रज्ञ हर्षल कर्वे लक्ष ठेवून आहेत.

वेळास, आंजर्ले, गुहागर या किनाऱ्‍यांवर अंडी घालून समुद्रात जाणाऱ्‍या कासवांना टॅगिंग केले असून, त्यांना नावेही देण्यात दिली आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button