रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर पावसाळ्यात वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना
रत्नागिरी कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ च्या चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने पाहणी करून ज्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत ते बुजवावेत तसेच ज्या ठिकाणी डायव्हर्जन करण्यात आलेले आहे त्या ठिकाणी पक्का डांबरी रोड करावा, हा रस्ता पूर्णपणे मातीचा असल्याने तो पाऊस सुरू झाल्यानंतर वाहने अडकून पडू नयेत यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. अशा सूचना महामार्ग वाहतूक मदत केंद्र यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व महामार्गाचे चौपदरीकरणातील कंत्राटदार यांना केल्या आहेत.दाभोळे बाजारपेठ येथील पुलाचा दोन्ही बाजूचा कठडा तुटल्यामुळे तेथे एकेरी वाहतूक सुरू आहे. तरी सदरचा कठडा बांधून घेण्यात यावा, साखरपा जाधववाडी येथील जाधववाडीकडे जाणारे रस्त्याजवळील नाल्याच्या वरील बाजूस नवीन रस्त्याचे काम चालू आहे. त्यामुळे जाधववाडीकडे येणारे पाणी तुंबून मुख्य रस्त्यावर येवू शकते. तरी तेथे नाला तयार करणे, आवश्यक आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाणी जाणेकरिता नाला निर्मिती करावी. महामार्गावर ज्या ठिकाणी नवीन रस्त्याची उंची वाढवण्यात आली आहे. त्या ठिकाणी चालू रस्त्यावर पावसामुळे माती वाहून येण्याची शक्यता असल्याने सँड बॅग्ज लावण्यात याव्यात अशा सूचना केल्या आहेत. www.konkantoday.com