
महाराष्ट्र परिवर्तनाच्या वाटेवर आहे-शरद पवार
लोकसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. यामध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडी मोठा विजय मिळवण्याच्या वाटेवर आहे. त्याचबरोबर देशातही इंडिया आघाडीनं एनडीएसमोर मोठं आव्हान निर्माण केलं आहे.निकालाचे आकडे समोर येत असल्यानं शरद पवारांनी आता या निकालाचं विश्लेषण केलं आहे. महाराष्ट्र परिवर्तनाच्या वाटेवर आहे, असंही पवार यांनी म्हटलं आहेशरद पवार म्हणाले, हे यश राष्ट्रवादी काँग्रेसचं यश आहे हे आम्ही मानत नाही. आम्ही जी महाविकास आघाडी केली त्या आघाडीच्यावतीनं, विशेषतः काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेच्या नेत्ववाखालील शिवसेना यांनी जीवाभावानं काम करण्याची भूमिका घेतली. त्यामुळं हे यश आम्हाला तिन्ही पक्षांना मिळालं आहे. महाराष्ट्रात सध्या परिवर्तनाचं वातावरण आहे. आम्ही तिघेही एकत्र राहून पुढच्या काळात आमची धोरणं ठरवू आणि महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेची काळजी घेऊ. उद्याची बैठक ही दिल्लीत असेल त्या बैठकीत मी हजेरी लावणार आहे. मी चंद्रबाबूंशी बोललो नाही आणि इतर कोणाशीही बोललेलो नाही. मी केवळ काँग्रेसशी बोललो आहे. यासंदर्भात आमच्या सहकारी पक्षांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असंही यावेळी शरद पवारांनी स्पष्ट केलं.www.konkantoday.com