
महापुरानंतर चिपळूण शहराची पुरातून मुक्तता व्हावी यासाठी तीन वर्षात १७.७० लाख घनमीटर गाळ उपसा
महापुरानंतर चिपळूण शहराची पुरातून मुक्तता व्हावी यासाठी गेल्या तीन वर्षापूर्वी शहरातील वाशिष्ठी नदीतील गाळ उपसा केला जात आहे. सलग तिसर्या वर्षी नदीतील पहिल्या आणि दुसर्या टप्प्यात आतापर्यंत सुमारे ५ लाख घनमीटर असा गाळ काढला गेला आहे. आतापर्यंत गेल्या तीन वर्षात एकूण १७ लाख ७० हजार घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. प्रारंभीच्या दोन वर्षाच्या तुलनेत यावर्षीचा उपसा काहीसा थंडावलेला दिसत आह. दरम्यान पावसाळा सुरू होईपर्यंत गाळ उपसा सुरूच राहणार आहे.चिपळूण शहर परिसराला पूर हा नवा नसला तरी २१ जुलै २०२१ रोजी आलेल्या प्रलयंकारी महापुराने चिपळूण शहरासह परिसराला पुरते उध्वस्त करून टाकले. मोठी आर्थिक व जीवित हानी झालेल्या या महापुरानंतर त्यांच्या कारणांचा आणि उपाययोजनांचा शोध घेण्यात आला. त्यामध्ये गाळाने भरलेल्या नद्या हे प्रमुख कारण पुढे आले आहे. www.konkantoday.com