
शाळकरी मुलींच्या मृत्यूचा छडा लवकरच लावावा, राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांची मागणी
कादवड-कातकरवाडीतील मधुरा जाधव व सोनाली निकम या दोन शाळकरी मुली कपडे धुण्यासाठी तिवरे नदीच्या पदळी पात्रात गेल्या असताना त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत गुढ कायम असून व्होसेरा अहवालानंतर ते उलगडणार आहे. या प्रकरणी पोलीस यंत्रणाही तपासात गुंतली आहे.दरम्यान सोमवारी राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी अलोरे-शिरगाव पोलीस स्थानकात जावून या मृत्यू प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावावा अशी मागणी केली. www.konkantoday.com