
पैसे घेवून वाहन न देणार्या रिव्हरसाईड होंडा कंपनीविरूद्ध ग्राहक आयोगाचा आदेश
गाडीच्या कोटेशनची रक्कम स्वीकारूनही कबूल केल्याप्रमाणे गाडी दिली गेली नाही. ग्राहकाच्या सेवेत त्रुटी ठेवली गेल्याने वाहन विक्रेत्याविरूद्ध ग्राहक आयोगाने आदेश जारी केले आहेत.सौरभ महादेव माने, रा. नाचणे रोड रत्नागिरी, यांनी मॅनेजर रिव्हरसाईड होंडा, एमआयडीसी रत्नागिरी, मॅनेजर सुशांत धानल, रसिका मोटर्सकरिता कोल्हापूर, होंडा कोर्स इंडिया गौतम बुद्ध नगर उत्तरप्रदेश यांच्या विरूद्ध रत्नागिरी येथील ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली.ही तक्रार मंचाचे अध्यक्ष अरूण गायकवाड, सदस्य स्वप्नील मेढे, सदस्या अमृता भोसले यांच्या समोर सुनावणीस आली. सुभाष मााने यांच्याकडे असलेली महिंद्रा लोगन ही गाडी जुनी झाल्याने त्यांना नवीन गाडी खरेदी करायची होती. रिव्हरसाईड होंडाचे मॅनेजर प्रदीप कोतवडेकर यांनी होंडा ब्ल्यू आर ही गाडी विकायची आहे. असे सांगितले. गाडीची किंमत ८ लाख ४० हजार ठरली. ग्राहक सुभाष माने यांनी जुनी गाडी घेवून नवीन गाडी देण्याचे शोरूममध्ये मान्य करण्यात आले. माने यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाकडे कर्ज घेतले. होंडा गाडी खरेदीसाठी विक्रेत्यांना ७ लाख ६५ हजार रु. एवढी रक्कम अदा करण्यात आली. जुन्या गाडीची किंमत ७२ हजार रु. लक्षात घेण्यात आली. विक्रेत्यांना ८ लाख ३७ हजार रु. पोच झाले. ठरवलेल्या दिवशी ग्राहक माने हे गाडी नेण्यासाठी आले. तेव्हा शोरूममधून गाडीचा ताबा मिळाला नाही. यानंतर माने यांनी दिलेल्या नोटीसला ते उत्तर दिले नाही. अखेर माने यांनी रत्नागिरी येथील ग्राहक आयोगात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. www.konkantoday.com