
जयगड येथील जिंदल पोर्ट वायू गळतीतील बाधितांना पाच लाख द्या, समाजवादी पार्टीचे मुख्यमंत्र्यांना पत्र.
जयगड येथील जिंदल पोर्ट परिसरातील एलपीजी प्रकल्पाची देखभाल सुरू असताना झालेल्या वायू गळतीमधील बाधितांना प्रत्येकी पाच लाख सानुग्रह अनुदान द्यावे आणि या गंभीर प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी पत्राद्वारे समाजवादी पार्टीचे प्रदेश सचिव शिवाजीराव परूळेकर आणि कोल्हापूर जिल्हा समाजवादी पार्टीतर्फे करण्यात आली आहे. हे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे.
या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेवून संबंधित दोषींवर कायदेशीर कारवाई करावी आणि भविष्यात दुर्घटना घडू नये म्हणून प्रकल्प रद्द करावा, वायूगळतीमुळे ज्यांना दुष्परिणाम भोगावे लागले त्यांना प्रत्येकी पाच लाख रुपये भरपाई द्यावी आणि या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी समाजवादी पार्टीचे परूळेकर आणि जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, उपाध्यक्ष रविंद्र जाधव यांनी मुख्यमंत्र्यांकडे एका पत्राद्वारे केली आहे.www.konkantoday.com