देवरूख ग्रामीण रूग्णालयात सर्प, विंचू दंशावरील अद्यावत औषधे उपलब्ध करा
सर्प व विंचू दंशावरील अद्यावत औषधे देवरूख ग्रामीण रूग्णालयात उपलब्ध व्हावीत अशा मागणीचे निवेदन गाव विकास समितीच्या वतीने रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संदीप माने यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे.संगमेश्वर तालुका विस्तीर्ण असून ग्रामीण भाग सर्वाधिक आहे. येथील ग्रामस्थांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. सध्या शेती हंगामातील कामांना सुरूवात झाली आहे. या हंगामात ग्रामीण भागात अनेक ठिकाणी सर्पदंश व विंचू दंशाच्या घटना घडत असतात. नुकतीच अशीच एक घटना निवे बुद्रूक येथे घडली. सुर्वे नामक महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाला.देवरूख व संगमेश्वर तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. तालुक्यातील रूग्ण उपचारासाठी देवरूख ग्रामीण रूग्णालयात येतात. या ठिकाणी सर्प व विंचू दंशाचे औषध उपलब्ध व्हावे, अशी मागणी गाव विकास समितीने केली आहे.www.konkantoday.com