चौपदरीकरणासाठी झाडांची कत्तल, महामार्गावर नवीन झाडे कधी लावणार?
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरणाच्या कामासाठी अनेक झाडे तोडण्यात आली आहेत. संगमेश्वर पट्ट्यातील अनेक झाडे वनविभागाची परवानगी नसतानाही तोडण्यात आली आहेत. चौपदरीकरणाचे काम गेले अनेक वर्षे रखडले आहे. रस्त्यांच्या लगतची अनेक जाडे तोडण्यात आली आहेत. त्यामुळे सावली गायब झाली आहे. मात्र रस्त्याच्या दुतर्फा नव्याने झाडे लावण्यासाठी कोणत्याही प्रकारची हालचाल दिसून येत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.www.konkantoday.com