चिपळूण शहरातील खेंड भागात डोंगराला लागूनच इमारतीचे बांधकाम
चिपळूण शहरातील खेंड भागात डोंगराला लागून भलीमोठी इमारत बांधली जात आहे. काही महिन्यापूर्वी याच इमारतीच्या बाजूला असलेल्या इमारतीवर डोंगराचा भाग कोसळून एका सदनिकेत मोठा दगड घुसला होता. सुदैवाने कोणतीही हानी झाली नव्हती. असे असताना काणत्याही उपाययोजना न करता बांधल्या जाणार्या या इमारतीच्या बांधकामाकडे नगर परिषद दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.शहरातील खेंड भागाच्या वरील बाजूला डोंगर आहे. तरीही गेल्या काही वर्षापासून डोंगराच्या पायथ्याशी सर्व नियम धाब्यावर बसवून इमारती व घरे बांधली जात आहेत. त्याला नगर परिषदेतील तत्कालीन अधिकारी, कर्मचारी अधिक जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे.www.konkantoday.com