
चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील गांजा प्रकरणातील त्या महिलेला अटक
चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे एका महिलेच्या घरातून तब्बल ५ किलोहून अधिक गांजा सापडल्याच्या खळबळजनक घटनेनंतर या प्रकरणी त्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी हा गांजा जप्त केला असून रविवारी त्या महिलेला न्यायालयात हजर केले असता तिला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, चिपळुणात पुन्हा एकदा गांजा विक्रीचे रॅकेट कार्यरत असून यात महिला सक्र्रीय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.मीनाक्षी छोटू जयस्वाल (५१, सावर्डे बाजारपेठ) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.www.konkantoday.com