गुहागर तालुक्यातील देवघर येेथे नदीकिनारी आढळलेल्या तरूणाचा मृत्यू संशयास्पद?
गुहागर तालुक्यातील देवघर येथे नदीकिनारी आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून तो खेड तालुक्यातील आंबडस गवळवाडी येथील असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले. गुहागर येथील पोलीस ठाण्यात तशी नोंदणी झाली असून या तरूणाच्या मृत्यूमागे घातपाताचाा संशय व्यक्त करण्यात आला आहे.आंबडस गवळवाडी येथील गणेश शिवराम माने (४५) हा तरूण १७ एप्रिल २०२४ रोजी आपली सासरवाडी चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने गोपाळवाडी येथे माहेरी आलेल्या पत्नीला व मुलांना भेटण्यासाठी आता होता. यानंतर ओ आंबडस या त्याच्या गावी परतला नसल्याने नातेवाईकांनी शोधाशोध केली. यानंतर तशी बेपत्ता नोंद २४ एप्रिल रोजी खेड पोलीस ठाण्यात त्याच्या नातेवाईकांनी केली होती. यानंतर ३१ मे रोजी चिपळूण पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता.www.konkantoday.com