
आजाराला कंटाळून चिपळुणातील वृद्धाची आत्महत्या
आजारास कंटाळून एका ७० वर्षीय वृद्धाने आत्महत्या केल्याची घटना १ जून रोजी मिरवणे-आवटेवाडी येथे घडली. याप्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. एकनाथ गणपत आवटे (७०, मिरवणे-आवटेवाडी) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ आवटे यांना मणका दुखीचा आजार होता. या आजारास ते कंटाळलेले होते. असे असताना त्यांनी घराच्या पाठिमागील पडवीच्या वाशाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. www.konkantoday.com