
अपुर्या पोलीस कर्मचार्यांमुळे दापोली शहरात वाढतेय बेशिस्त पार्किंग
दापोली शहराला सध्या बेशिस्त पार्किंगचा विळखा बसला आहे. पोलीस कर्मचार्यांची संख्या अपुरी असल्यामुळे बेशिस्त पार्किंग करणार्यांचे चांगलेच फावले आहे.दापोलीत मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. मात्र पर्यटक येथे आल्यानंतर बेशिस्त प्रकारे गाड्या उभ्या करतात. यामुळे स्थानिक नागरिकांसोबत अनेकवेळा वादाचे प्रसंगही उदभवतात.पोलिसांची संख्या अपुरी असल्यामुळे २४ तास पोलीस कर्मचारी देणे पोलिसांना शक्य होत नाही. त्यामुळे बेशिस्त पार्किंग वाढत आहे. www.konkantoday.com