
रत्नागिरी ग्राहक पेठतर्फे दीपावली निमित्त प्रदर्शन; स्टॉल बुकिंगसाठी आवाहन
रत्नागिरी– प्रतिवर्षाप्रमाणे दिपावली निमित्त रत्नागिरी ग्राहक पेठतर्फे जे. के. फाईल्स येथील साई मंगल कार्यालयात महिला बचत गट व उद्योगिनींनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीचे आयोजन केले आहे. 27 ते 31 ऑक्टोबर 2021 या कालावधीत प्रदर्शन होणार आहे.
बचत गटातील महिला व उदयोन्मुख उद्योगिनी महिलांसाठी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. ज्यांना या प्रदर्शनात स्टॉल घ्यायचा असेल, त्यांनी त्वरित संपर्क साधावा. प्रथम येणाऱ्या स्टॉल्सना प्रवेश दिला जाईल. स्टॉल बुकिंगसाठी 20 ऑक्टोबर अंतिम तारीख आहे, तोपर्यंत संपर्क साधावा.
महिलांची उद्योग व्यवसायात प्रगती व्हावी, त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू, उत्पादनास बाजारपेठ मिळावी, याकरिता हे प्रदर्शन उपयुक्त ठरते. गेली 15 वर्षांहून अधिक काळ हे प्रदर्शन भरवण्यात येत आहे. अनेक महिला बचत गट उभे करून त्यांना बाजारपेठ मिळवून देण्यासह सर्व मदत करण्याचे कार्य श्रीमती प्राची शिंदे करत आहेत.
या प्रदर्शनात स्टॉल बुकिंगसाठी रत्नागिरी ग्राहक पेठेच्या प्रमुख आणि सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती प्राची शिंदे 97644 17079 /9422376224 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
www.konkantoday.com