समुद्री खेळ बंद झाल्याने दापोलीचा पर्यटन व्यवसायाचा टक्का आला निम्म्यावर
पावसाळा तोंडावर आल्यामुळे शासनाच्यावतीने समुद्रातील खेळ बंद करण्यात आले आहेत. शिवाय दापोलीतील तापमानाने देखील उच्चांक गाठला आहे. याचा थेट परिणाम पर्यटकांची संख्या निम्म्यावर येण्यात झालेला आहे. यामुळे पर्यटनाच्या शेवटच्या हंगामाकडे डोळे लावून बसलेल्या हॉटेल व्यावसायिकांसमोर नवे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.पावसाळा जवळ आला की समुद्राला उधाण येते. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शासनाच्यावतीने पावसाळ्याच्या आधी सागरी खेळांवर बंदी घालण्यात येते. ही बंदी घालण्यात आल्यामुळे अनेक पर्यटकांनी दापोलीकडे पाठ फिरवली आहे.www.konkantoday.com