
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज,राजकीय कार्यकर्त्याला क्यूआर कोड स्कॅन करावा लागणार
संपूर्ण जगासह देशाचे लक्ष लागलेल्या लोकसभेच्या निवडणुकीची मतमोजणी उद्या सकाळपासून सुरू होत आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची मोजणी ही रत्नागिरीत होणार असून जिल्हा प्रशासन त्यासाठी सज्ज झाले आहेमंगळवारी 4 जून रोजी लोकसभा निवडणूकीची मतमोजणी होत आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी मिरजोळे एमआयडीसी मधील भारतीय अन्न गोदामात मतमोजणी होणार आहे. दरम्यान प्रतिस्पर्धी उमेदवार समोरासमोर येऊन वाद निर्माण होऊ नयेत याकरिता पोलिसांनी राजकीय पक्षांसाठी स्वतंत्र जागा नेमून दिल्या आहेत.हा बंदोबस्त करताना पोलिसांनी तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.मतमोजणीच्या ठिकाणी जाताना राजकीय कार्यकर्त्याला क्यूआर कोड स्कॅन करावा लागणार आहे. क्यू आर कोड स्कॅन केल्यावर मॅपच्या सहाय्याने कार्यकर्त्याला मतमोजणी करीता जाता येणार आहे.मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. मतमोजणीसाठी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते गर्दी करतात. अशावेळी प्रतिस्पर्धी कार्यकर्ते समोरासमोर येऊन वादाचे प्रसंग घडतात. हे प्रसंग टाळण्यासाठी पोलिसांनी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे.www.konkantoday.com