
रत्नागिरी शहरातील बहुतांश गॅस पुरवठा खंडित… अशोका गॅस ची पाईपलाईन एमआयडीसी भागात फुटली
रत्नागिरी शहरात घराघरात पाईप लाईन ने गॅस पुरवठा करणाऱ्या अशोका गॅस ची पाईप लाईन एमआयडीसी भागात झिलानी मरीन समोर फुटली आहे. पाईप लाईन फुटल्याने शहरातील गॅस पुरवठा ठप्प झाला आहे. रत्नागिरी शहरात पाईपलाईन घालताना गॅस कंपनीने खुणेसाठी तिथे बोर्ड लावलेले आहे अज्ञात व्यक्ती नी बुलडोझर ने काम करताना ही पाईप लाईन फोडल्याची प्राथमिक माहिती हाती येत आहे.नेमका सोमवारी सकाळी गॅस बंद झाल्याने सर्वसामान्य लोकांचे हाल झाले आहेत.लवकरात लवकर गॅस पुरवठा पूर्ववत करू असा अशोका गॅस कडून सांगितलं जातं आहे ही पाईपलाईन फोडणाऱ्या वर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहेwww.konkantoday.com