
जागतिक डास दिनानिमित्त आरोग्य केंद्र मालगुंड येथे जनजागृती कार्यक्रम
मालगुंड : जागतिक डास दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र, मालगुंड येथे जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात डासामुळे होणारे रोग जसे की मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया याबाबत माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस वैद्यकीय अधिकारी डॉ सुनीता पवार यांनी डास नियंत्रणाचे महत्त्व सांगत स्वच्छता राखणे, पाणी साचू न देणे, डास प्रतिबंधक उपाययोजना वापरणे याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी रुग्ण व नागरिकांना पत्रकांचे वाटप करून डास नियंत्रणाचे संदेश पोहोचविण्यात आले.
या कार्यक्रमात आरोग्य कर्मचाऱ्यांनी गावकऱ्यांना “स्वच्छता हीच डासांवरील खरी लस आहे” असा संदेश दिला. उपस्थित ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत करून डास नियंत्रणासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. या वेळी आरोग्य अधिकारी कर्मचारी व ग्रामस्थ रुग्ण उपस्थित होते