पदवीधर मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांना तर मुंबई पदवीधर मतदारसंघात किरण शेलार आणि आणि मुंबई शिक्षक मतदारसंघात शिवनाथ दराडे यांना भाजपाने संधी दिली
महाराष्ट्रात विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. कोकण पदवीधर, मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक होत असून, या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच भाजपाने तीन मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार जाहीर केले आहेत.कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये भाजपाने विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांना उमेदवारी दिली आहे. तर मुंबई पदवीधर मतदारसंघात किरण शेलार आणि आणि मुंबई शिक्षक मतदारसंघात शिवनाथ दराडे यांना भाजपाने संधी दिली आहे. विधान परिषदेच्या या जागांसाठी २६ जून रोजी मतदान होणार आहे.www.konkantoday.com