
दापोली लाडघर येथील प्रसिद्ध बागायतदार प्रसाद बाळ यांचे निधन
लाडघर (ता. दापोली) : दापोली तालुक्यातील लाडघर येथील प्रसिद्ध बागायतदार प्रसाद बाळ यांचे वयाच्या ६९व्या वर्षी रविवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. लाडघर येथील बुरोंडी करंजगाव लाडघर शिक्षण संस्थेचे ते पंचवीस वर्षे अध्यक्ष होते. लाडघर परिसरातील विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, क्रीडा अशा विविध क्षेत्रांमध्ये गेली अनेक वर्षे ते आघाडीवर राहून काम करीत होते. त्यांच्या पश्चात सीए मुलगा मिहीर, मुलगी चिन्मयी, पत्नी पल्लवी, आई, दोन भाऊ असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने लाडघर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.www.konkantoday.com