जुनेजाणते धडाडीचे शिवसैनिक सुधीरभाई लोध यांचे वयाच्या ७५व्या वर्षी निधन
रत्नागिरी- शिवसेनेचे माजी नगरसेवक तसेच जय भवानी पतसंस्थेचे संस्थापक, जुनेजाणते धडाडीचे शिवसैनिक सुधीरभाई लोध यांचे वयाच्या ७५व्या वर्षी २ जून रोजी मुंबई येथे रात्री ९ वा. दु:खद निधन झाले. रत्नागिरी जिल्ह्यात त्यांचा दांडगा संपर्क होता. शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेना पक्षात त्यांनी काम केले. सत्ताबदल होतानाही त्यांनी शिवसेनेचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून स्वत:ची ओळख कायम ठेवली. त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त होत आहेwww.konkantoday.com