
मागण्या मान्य झाल्या नाहीत तर लांजा नगर पंचायत कर्मचारी आंदोलन करणार
लांजा नगर पंचायतीचे पूर्वाश्रमीचे ग्रामपंचायत सेवा केलेल्या कर्मचारी यांना नगर पंचायत सेवा अधिनियमानुसार वेतन आणि फरक मिळावा यासाठी राज्य नगरपरिषद व नगरपंचायत कर्मचारी संघर्ष समिती आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. जिल्हाधिकारी यांना समितीने निवेदन सादर केले आहे. जर मागण्या मान्य नाही झाया तर विभागीय आयुक्त कार्यालयासमोर १ जुलै रोजी लाक्षणिक उपोषण तसेच ६ ऑगस्टला प्रत्येक नगरपंचायत, नगर परिषदेतील कर्मचारी काम बंद आंदोलन करणार असल्याचे समजते.www.konkantoday.com