
कार चालवताना निवृत्त प्रभारी कुलगुरुंना अॅटॅक आल्यानं अपघात, 3 जणांचा मृत्यू 5 जण जखमी
कार चालवताना निवृत्त प्रभारी कुलगुरुंना अॅटॅक आल्यानं काळाजाचा ठोका चुकवणारा अपघात घडलाय. कोल्हापूरमधल्या सायबर चौकात हा भयंकर अपघात झाला. प्रा. वसंत चव्हाण असं या कारचालकाचं नाव आहे. ते कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठाचे निवृत्त प्रभारी कुलगुरु होते. चव्हाण कार चालवत असतानाच त्यांना अॅटॅक आला आणि त्यांचे नियंत्रण सुटलं. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले आहेत.कोल्हापूरच्या सायबर चौकात नेहमीच वाहनांची वर्दळ असते. या चौकातून नेहमीप्रमाणे वाहतूक सुरु होती. त्याचवेळी सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास चव्हाण यांच्या कारनं ऐन चौकातच एकमेकांना क्रॉस होणाऱ्या काही वाहनांना धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की, दुचाकीवरील लोकं जागेवरच उडाले. कारची धडक पहिल्यांदा ज्या दुचाकीला लागले ती दुचाकी दुसऱ्या दुचाकीला जाऊन धडकली.या अपघातामध्ये कारचालक वसंत चव्हाण, हर्षद पाटील आणि आणखी एकाचा मृत्यू झाला. हर्षद पाटील हा 16 वर्षांचा अल्पवयीन मुलगा होता. तो नुकताच दहावीची परीक्षा पास झाला होता. हर्षद प्रथमेश पाटील आणि जयराम पाटील या मित्रांसह दौलतनगरला नाश्टा करण्यासाठी निघाला होता. त्याचवेळी कारच्या धडकेत त्याचा मृत्यू झालाय. या अपघातील तिसऱ्या मृत व्यक्तीचं नाव अद्याप समजू शकलेलं नाही.www.konkantoday.com