कामावर असताना प्रकृती बिघडली, पोलीस कर्मचाऱ्यांचे हृदयविकाराने निधन
रत्नागिरीतील पोलीस कर्मचारी कामावर असताना त्याची प्रकृती बिघडली त्यानंतर घरी गेल्यानंतर परत त्रास सुरू झाल्याने घरच्यांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टर काही करु शकतील त्यापूर्वीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी स्वप्नील केशव जाधव (वय-३५, रा. मिऱ्या, रत्नागिरी) असं मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. रविवारी ही धक्कादायक घटना घडली. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यांच्या अकाली निधनाबद्दल पोलीस दलातून हळहळ व्यक्त केली जात आहे.स्वप्निल हे सेशन कोर्ट रत्नागिरी पैरवी कर्तव्यावर हजर होते. त्याप्रमाणे ते सेशन कोर्ट रत्नागिरी येथे ड्युटीवर हजर होते. त्यादरम्यान त्यांच्या छातीत दुखू लागले, उलटी झाल्याने ते कर्तव्य संपवून घरी गेले. त्यानंतर २ जून रोजी पहाटे ४ वाजता त्यांना पुन्हा उलट्या होऊन सकाळी छातीत दुखू लागले, त्यांच्या नातेवाईकांनी चिंतामणी हॉस्पीटल रत्नागिरी येथे औषध उपचारासाठी दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तपासून अधिक औषध उपचाराकरीता पुढे घेवुन जाण्यास सांगितले.नातेवाईकांनी अँस्टर आधार हॉस्पीटल कोल्हापूर येथे घेवून जात असताना प्रवासात दख्खन ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी येथे त्यांची प्रकृती अधिक बिघडल्याने उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र साखरपा येथे दाखल करण्यात आले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास तपासून मयत झाल्याचे घोषित केले.www.konkantoday.com