सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2 ते 4 जून कालावधीत यलो अलर्ट
सिंधुदुर्ग – प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2 ते 4 जून 2024 या कालावधीत यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. तसेच या कालावधीत जिल्ह्यात गडगडाट होवून पाऊस पडण्याची व विजा चमकण्याची शक्यता असून ताशी 40 ते 50 किमी प्रती तास वेगाने वारे वाहणार आहेत. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी पुढीलप्रमाणे दक्षता घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे. या कालावधीत विजा चमकत असताना पुढीलप्रमाणे दक्षता घेण्यात यावी विजा चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्रोतांपासून अलग करून ठेवावीत. दूरध्वनी, भ्रमणध्वनी चा वापर टाळावा. विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. विजेच्या खांबांपासून लांब रहावे. विजा चमकत असताना उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये. विजा चमकत असताना एखाद्या मोकळ्या परिसरात असल्यास, गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे. धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात. वीज पडण्याची पूर्वसूचना मिळण्याकरिता आपल्या मोबाईल वर ‘दामिनी APP’ डाऊनलोड करून घ्यावे. पाऊस पडत असताना विजा चमकत असल्यास नागरिकांनी झाडाखाली उभे राहू नये, मोबाईलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दुर रहावे. अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा. कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा. नियंत्रण कक्ष व संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे जिल्हा नियंत्रण कक्ष – 02362-228847 किंवा टोल फ्री 1077, 7498067835. पोलीस नियंत्रण कक्ष- 02362-228614/8275776213 पोलीस टोल फ्री हेल्पलाईन-112, दोडामार्ग तालुका नियंत्रण कक्ष- 02363-256518, सावंतवाडी तालुका नियंत्रण कक्ष- 02363-272028, वेंगुला तालुका नियंत्रण कक्ष- 02366-262053, कुडाळ तालुका नियंत्रण कक्ष- 02362-222525, मालवण तालुका नियंत्रण कक्ष- 02365-252045, कणकवली तालुका नियंत्रण कक्ष- 02367-232025, देवगड तालुका नियंत्रण कक्ष- 02364-262204, वैभववाडी तालुका नियंत्रण कक्ष- 02367-237239 या प्रमाणे नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमाक आहे. हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या https://mausam.imd.gov.in/mumbai/mcdata/district.pdf या संकेतस्थळावरून घ्या. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका. कुठल्याही मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडून करून घ्या किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष ०२३६२-२२८८४७ किंवा टोल फ्री १०७७ किंवा पोलीस हेल्पलाईन क्रमांक ११२ वर संपर्क करा. हवामान विभागाकडून दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या जीवित व मालमत्तेची काळजी घ्यावी.www.konkantoday.com