रत्नागिरी पालिकेने केलेल्या सर्व्हेमध्ये शहरात एकूण ७१ इमारती धोकादायक
रत्नागिरी पालिकेने केलेल्या सर्व्हेमध्ये शहरात एकूण ७१ इमारती धोकादायक आढळल्या आहेत. या इमारतींना परिषदेकडून नोटीस बजावण्यात आल्या आहेत. निवासी इमारतीमध्ये नागरिक राहत नसल्याने इमारती रिकाम्या आहेत. मात्र, शहरातील नवीन भाजीमार्केटची इमारत धोकादायक बनली आहे. मात्र, इमारतीतील व्यावसायिक जीव धोक्यात घालून व्यवसाय करीत आहे.पावसाळ्यापूर्वीची तयारी पालिकेने सुरू केली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडून जीवितहानी होऊ नये यासाठी पालिकेच्या मालमत्ता विभागाकडून सर्व्हे करण्यात आला. त्यामध्ये ७१ इमारती धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले आहे. पालिकेने त्यांना तत्काळ नोटिसा बजावून त्या रिकाम्या करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.www.konkantoday.com