मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा हिरवा गार केला जाणार
मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा हिरवा गार केला जाणार असून त्यासाठी खड्डे मारण्याचे काम जोरात सुरू आहे. शिवाय वृक्षारोपणासाठी रोपांची उपलब्धता करण्यात आली आहे.मुंबई-गोवा महामार्ग पूर्वीपासूनच सावली देणारा मार्ग होता.दोन्ही बाजूंना मोठमोठे वृक्ष होते. पण चौपदरीकरण कामात हजारो वृक्ष तोडण्यात नव्हे तर त्यांची कत्तल करण्यात आली. महावृक्षतोडीमुळे महामार्गावरील सावली नष्ट झाली, पर्यावरणाच्या साखळीलाही धोका निर्माण झाला. मात्र, नियमानुसार जितके वृक्ष तोडले तेवढे वृक्ष पुन्हा लावण्याची जबाबदारी शासन आणि संबंधित ठेकेदाराची असते. त्यानुसार वनविभागाने यावर्षी महामार्गालगत वृक्षारोपण करण्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे.www.konkantoday.com