
राज्यात करोना विषाणूच्या विरोधात लढाई करताना राज्याचे नेतृत्व दुबळे पडत आहे – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
राज्यात करोना विषाणूच्या विरोधात लढाई करताना शासन व प्रशासनासह मंत्री-मंत्री आणि मंत्री व प्रशासनात कोणताही ताळमेळ दिसत नाही. यात राज्याचे नेतृत्व दुबळे पडत आहे, असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला.फडणवीस म्हणाले, करोना हा राजकीय विषय नाही, तर लढाईचा विषय आहे.त्याविरोधात लढताना शासन व प्रशासनात योग्य समन्वय असावा लागतो. मंत्री-मंत्री, अधिकारी यांच्यात समन्वय नसेल तर तो राज्याच्या नेतृत्वाने साधावा लागतो. परंतु, सध्याची परिस्थिती पाहता त्याचा पूर्ण अभाव आहे. अधिकारी तर स्वतःच शिष्टाचार ठरवू लागले आहेत. ते दूर व्हायला हवेत असेही ते म्हणाले
www.konkantoday.com