मान्सूनपूर्व बैठकीत चिपळूण नगरपरिषद प्रशासनावर व्यापाऱ्यांचा प्रश्नांचा भडिमार
चिपळूण शहरात सातत्याने पूल येतो. तो आल्यावर आपण नागरिक, व्यापार्यांना मदत करण्यासाठी सर्व यंत्रणा तैनात ठेवता ही बाब जरी चांगली असली तरी पूर येवूच नये म्हणून तुम्ही काय उपाययोजना केल्यात, असे अहवाल इतके वर्षे शासनाला पाठवले का, शिवनदी, वाशिष्ठीतील अतिक्रमणानंतर कारवाई का होत नाही, नव्या इमारतींना परवानगी मिळतेच कशी, अशा अनेक प्रश्नांना व्यापार्यांनी नगर परिषद प्रशासनावर भडीमार केला. त्यामुळे उत्तर देताना अधिकार्यांच्या नाकीदम आला.शुक्रवारी शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात व्यापार्यांची मान्सूनपूर्व नियोजन बैठक आयोजित केली होती. यावेळी प्रशासनाने यावर्षी पूर अथवा कोणत्याही प्रकारची आपत्ती आल्यास यंत्रणा कशी सज्ज आहे, याची माहिती दिली. त्यानंतर मात्र व्यापार्यांनी प्रशासनावर प्रश्नांचा भडीमार केला. पूर्वी पेठमाप भागातून पुराचे पाणी शहरात घुसायचे मात्र आता महामार्गाची गटारे उंच असल्याने त्यात डोंगरातून येणारे पाणीच जात नसल्याने व ही गटारे कचर्याने भरल्याने पाण्याला वाट मिळेल तिर्थन ते शहरात येते व आता वरच्या भागातून पाणी भरण्यास सुरूवात होते. याचा जाब तुम्ही महामार्ग विभागाला व ठेेकेदाराला कधी विचारला आहे काय, असा सवाल उपस्थित केला. यावर चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले.www.konkantoday.com