माझा विजय निश्चित आहे, – केंद्रीय मंत्री नारायण राणे

मी मागील पाच-पन्नास वर्षे राजकारणात घालवली. आमचे पण काही अंदाज आहेत. आम्ही पण निवडणूक लढवली आहे. आम्ही निवडणुकीत नामधारी नाही, तर सक्रिय होतो, त्यामुळे एक्झिट पोलकडे मी पाहत नाही, माझा विजय निश्चित आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली. कुडाळ येथील गुलमोहर हाॅल येथे पदवीधर मतदारसंघ निवडणूकीची आढावा बैठक शनिवारी पार पडली. या बैठकीनंतर ना.राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला.पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या विजयासाठी आपण सर्वांनी कामाला लागावे. केंद्रात व राज्यात आपली सत्ता आहे, त्यामुळे लोकसभेपाठोपाठ पदवीधर मतदार संघातही आपला विजय निश्चित होईल, असा विश्वासही यावेळी ना. राणे यांनी व्यक्त केला.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button