
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मुंडण करेन-सोमनाथ भारती
एक्झिट पोलमध्ये NDA पुन्हा एकदा आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे. याच दरम्यान आम आदमी पार्टीचे नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सोमनाथ भारती यांनी मोठा दावा केला आहे. “नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मुंडण करेन.४ जून रोजी सर्व एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील. दिल्लीतील सातही जागा इंडिया आघाडी जिंकेल” असं सोमनाथ यांनी म्हटलं आहे.सोमनाथ भारती यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. “नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर ते मुंडण करेन. माझे हे शब्द लक्षात ठेवा. ४ जून रोजी सर्व एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील आणि मोदीजी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार नाहीत. दिल्लीतील सातही जागा इंडिया आघाडी जिंकेल. मोदीजींच्या भीतीमुळे एक्झिट पोल त्यांना पराभूत झाल्याचे दाखवू देत नाहीत. त्यामुळे आपल्या सर्वांना ४ जूनला निकालाची वाट पाहावी लागेल. जनतेने भाजपाच्या विरोधात प्रचंड मतदान केलं आहे” असं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.www.konkantoday.com



