डिझेलची तस्करी, मच्छीमार नौकेला पकडले, तटरक्षक दलाकडून कारवाई
तटरक्षक दलाने पश्चिम किनार्यावरून मच्छीमार नौकेला पकडले आहे. नौकेवर ५ जण खलाशी म्हणून काम करीत होते. ही नौका डिझेलच्या तस्करीमध्ये गुंतली असल्याचे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.वृत्तसंस्थांनी या संदर्भात बातमी दिली आहे. त्यात नमूद केले आहे की ५ टन एवढे बेहिशोबी डिझेल या नौकेवर सापडले. त्याची किंमत सुमारे २७ लाख रुपये एवढी आहे. हे माशांच्या साठ्यामध्ये लपवले हातेे. याशिवाय अल्प स्वरूपात प्रतिबंधित अंमली पदार्थही सापडले. गेल्या ३ दिवसात कोस्टकार्डने अनधिकृत डिझेल साठ्याविरूद्ध चालवलेल्या मोहिमेत ५५ हजार लिटर डिझेल पकडले गेले.जय मल्हार नावाच्या या मच्छीमार नौकेवर ५ जण खलाशी काम करत होते. या नौकेवर बेकायदा डिझेल व्यवहार हाताळले जात असत. पकडलेली नौका मुंबई बंदरात आणण्यात आली असून खलाशी लोकांचा तपास मोहीम, सीमा शुल्क विभाग, आणि मत्स्य विभाग करत आहेत. www.konkantoday.com