
सिंधुदुर्ग येथे होणार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
सिंधुदुर्ग,ता.०१-
जिल्ह्यात अखेर वैद्यकीय महाविद्यालय होण्याचा मार्ग मोकळा झाला असून सदर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्मिती करिता संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई यांच्यावतीने कृती समिती स्थापन करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण व संशोधन सहसंचालकांनी दिले आहेत.त्यामुळे लवकरच आता सिंधुदुर्गात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार आहे.
तसेच नंदुरबार,सातारा, परभणी, बुलढाणा, अमरावती, नाशिक या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय उभारणीकरिता आवश्यक ते प्रयत्न ही शासनाकडून करण्यात येत आहेत.
www.konkantoday.com