चिपळुणात पानटपरीवर सापडला ६० ग्रॅम गांजा
पान टपर्यांवर छुप्या पद्धतीने गांजा विक्री होत असल्याने पोलिसांकडून शहरासह परिसरात टपर्यांची तपासणी मोहीम सुरू आहे. शुक्रवारी या तपासणीत खेर्डी-मोळेवाडी येथे एका पानटपरीत पोलिसांना ६० ग्रॅम गांजा सापडला. संशयित टपरीचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने गांजा कोणाकडून आणला हे पोलीस तपासणीतून पुढे येणार आहे.साईराज मनोहर कदम (खेर्डी) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी नव्याने सुरू असलेल्या इमारतीमध्ये काही तरूण गांजा ओढताना त्यांना रंगेहाथ पकडण्याच्या खळबळजनक घटनेनंतर शहरात राजरोसपणे सुरू असलेला गांजा विक्रीचे उच्चाटन व्हावे, यासाठी शहरातील सामाजिक संस्थांसह राजकीय पक्षाच्या पुढाकाराने पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे.www.konkantoday.com