गणपतीपुळे समुद्रात सोलापूरच्या पर्यटकांचा बुडून मृत्यू, तिघांना वाचवण्यात यश

गणपतीपुळे समुद्रात सोलापूरच्या पर्यटकांचा बुडून मृत्यू, झाला त्याच्याबरोबरच्या तिघांना वाचवण्यात यश आलेगणपतीपुळे येथील समुद्रात रविवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास सोलापूर जिल्ह्यातील अजित धनाजी वाडेकर (वय वर्षे २५) या तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. तर तीन तरूणांना वाचविण्याची कामगिरी स्थानिक जीवरक्षक, येथील व्यावसायिक व गणपतीपुळे पोलिसांच्यावतीने करण्यात आली.गणपतीपुळे येथे रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सोलापूर जिल्ह्यातील इसबावे या ठिकाणाहून अजित धनाजी वाडेकर (२५), अजय बबन शिंदे (२३), सार्थ दत्तात्रय माने (२४) व आकाश प्रकाश पाटील (२५) असे चार तरूण गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आले होते यावेळी या तरूणांनी प्रथम देवदर्शन न करता गणपतीपुळे समुद्राच्या पाण्यात आंघोळीसाठी उतरण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हे चारही तरूण समुद्राच्या पाण्यात उतरले असता त्यांनी खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न केला असता त्यातील अजित वाडेकर हा खोल समुद्राच्या पाण्यात जाऊन अडकला. यावेळी अजित याला पाण्याबाहेर येता येत नसल्याचे लक्षात येता त्याच्या बरोबर असलेल्या तरूणांनी व समुद्राच्या पाण्यात असलेल्या इतर पर्यटकांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. ही बाब समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या जीवरक्षक व सध्या गर्दीचा हंगाम असल्याने गस्तीवर असलेल्या गणपतीपुळे पोलीस दूर क्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप साळवी व हेड कॉन्स्टेबल कुणाल चव्हाण यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्कळ क्षणाचा ही विलंब न लावता गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक यांना पाचारण करून समुद्राच्या पाण्यात पाठवले. यावेळी गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावरील जीवरक्षक अक्षय माने, महेश देवरुखकर, अंजिक्य रामाणी, विशाल निंबरे, आदींसह गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावरील येथील व्यावसायिक राकेश शिवलकर यांनी समुद्राच्या पाण्यात उडया घेऊन समुद्राच्या खोल पाण्यात अडकलेल्या तीन तरूणांना पाण्याबाहेर काढले. त्यानंतर समुद्राच्या पाण्यात अडकलेल्या अजित वाडेकर या तरूणाला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला पाण्याबाहेर काढल्यानंतर तो बेशुद्ध अवस्थेत असल्याने त्याला मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र या ठिकाणी अजित याने उपचाराला प्रतिसाद न दिल्याने त्याला मृत घोषित करण्यात आले www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button