
दीर्घकालीन संसाधनांचे व्यवस्थापन करण्यासाठी स्रोत बळकटीकरण करणे ही काळाची गरज चिपळूण गटविकास अधिकारी श्रीमती उमा घारगे -पाटील यांचे प्रतिपादन.
रत्नागिरी : “दीर्घकालीन संसाधनांचे व्यवस्थापन करण्यासाठी स्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरण करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन करून शाश्वतता केवळ पर्यावरणाशीच संबंधित नसून, सध्याच्या आणि भविष्यातील जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी शाश्वतता एक आवश्यक भाग आहे, असे प्रतिपादन चिपळूणच्या गटविकास अधिकारी श्रीमती उमा घारगे -पाटील यांनी केले.जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत ग्रामपंचायत स्वच्छता समितीमधील पदाधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी स्रोत बळकटीकरण व शाश्वती करण्यासाठी दोन दिवसीय अनिवासी प्रशिक्षणाचे आयोजन माते सभागृह, चिपळूण येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी येत्या ५ जून रोजी असणाऱ्या जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर गटविकास अधिकारी श्रीमती यांच्या हस्ते घारगे -पाटील वडाचे व कांदळवन रोपाचे वाटप करण्यात आले. तसेच राज्यस्तरावरून रासायनिक फिर टेस्ट किटही ग्रामपंचायतींना वितरित करण्यात आले.या प्रशिक्षणाला पंचायत समितीचे विस्तार अधिकारी स्वप्नील कांबळे व गट संसाधन केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.