आमदार राजन साळवींच्या प्रयत्नानेअखेर ग्रामीण रूग्णालय लांजा येथे नवीन वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरजकुमार पंदिरकर रूजू
ग्रामीण रूग्णालयात लांजा येथे एमबीबीएस डॉक्टर नसल्याने रूग्णांचे प्रचंड हाल होत असल्यामुळे आमदार राजन साळवी यांनी रत्नागिरी येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांची भेट घेवून चर्चा केली होती. त्यावेळी आमदार राजन साळवी यांनी रविवारपर्यंत लांजा ग्रामीण रूग्णालयास एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध करून न दिल्यास त्यांच्या दालनाच्या बाहेर आंदोलनास बसण्याचा इशारा दिला होता. अखेर ग्रामीण रूग्णालय लांजा येथे शुक्रवारी नवीन वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरजकुमार पंदिरकर रूजू झाले. नागरिकांची गैरसोय होत असल्याने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांची आमदार साळवी यांनी भेट घेतली होती. त्यावेळी लांजा ग्रामीण रूग्णालयास एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन जगताप यांनी दिले होते. त्याअनुषंगााने शुक्रवारी लांजा ग्रामीण रूग्णालय येथे वैद्यकीय अधिकारी पंदिरकर हे रूजू झाले. www.konkantoday.com