शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती व दासबोधही नको -जिजाऊ ब्रिगेडची मागणी
राज्य सरकारने ताबडतोब विचार करून अभ्यासक्रमातून मनुस्मृती आणि दासबोध ताबडतोब हटवावे, अन्यथा जिजाऊ ब्रिगेडला शिक्षण विभागावर मोर्चा नेवून संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन उभे करावे लागेल, असा इशारा देणारे निवेदन नायब तहसिलदार समीर देसाई यांना दिले आहे.महाराष्ट्र शासनाच्या शाळांमध्ये मनुस्मृती आणि रामदास स्वामींच्या दासबोध या ग्रंथातील श्लोकांचा समावेश करण्यात येणार असल्याची बातमी महाराष्ट्रभर पसरली आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली असुन अभ्यासक्रमात मनुस्मृती आणि दासबोधाचा समावेश करून सरकारला विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारचे शिक्षण द्यायचे आहे, असा प्रश्न सर्व स्तरातून विचारला जात असून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागावर सर्वत्र टीकेची झोड उठवली आहे. मनुस्मृती हा हिंदू धर्मातील समस्त बहुजन समाजाचा अपमान करणारा आणि त्यांना हीन लेखणारा ग्रंथ आहे. तसेच मनुस्मृतीने हिंदू धर्मातील समस्त स्त्रियांना जनावरांपेक्षाही खालचा दर्जा दिलेला असून स्त्रियांना सर्व प्रकारचे हक्क आणि अधिकार नाकारले आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांनाही मनुस्मृतीचा आधार घेवूनच प्रचंड विरोध झालेला आहे. सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या शैक्षणिक कार्याला मनुस्मृतीचा आधार घेवूनच प्रतिगाम्यांनी विरोध केलेला होता. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेवून रायगडाच्या पायथ्याशी महाडला मनुस्मृतीचे जाहीर दहन केले होते. www.konkantoday.com