
नारायण तलावासाठी तब्बल साडेतीन कोटींचा खर्च
अनेक वर्षे दुर्लक्षित असलेल्या नारायण तलावाला गेल्या काही वर्षापासून नवा साज आणण्याचे काम नगर परिषद करीत आहे. सध्या तलावाचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून महिनाभरात अंतिम साज येणार आहे. या कामासाठी तब्बल साडेतीन कोटी रुपये खर्च होणार असून यात वाढ होण्याची शक्यता आहे. या खर्चापैकी २ कोटी ८० लाख रुपयांचा निधी शासनाच्या पर्यावरण विभागाने दिला आहे. तर ७० लाख रुपये नगर परिषद खर्च करणार असुन आतापर्यंत ठेकेदाराला १ कोटी ७० लाख रुपये अदा करण्यात आले आहेत.शहरात अनेक तलाव आहेत. मात्र त्यातील बहुतांशी तलाव दुर्लक्षित राहिले असून काही तलावांना स्थानिक नागरिक, संस्था यांच्या पाठपुराव्यामुळे नवसंजीवनी देण्याचे काम नगर परिषद करीत आहे. यातूनच नारायण तलाव गेल्या काही वर्षापासून नवरूप घेत आहे. या तलावाचे राज्य सरोवर संवर्धनमधून काम केले जात आहे. यासाठी साडेतीन कोटींचा खर्च येणार आहे. त्यापैकी २ कोटी ८० लाख रुपये पर्यावरण विभागाने दिले असून ७० लाख रुपये नगर परिषद खर्च करीत आहेत. सध्या या तलावाचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून यामुळे परिसराचा लूक बदलला आहे.महिनाभरात काम पूर्ण होणार असून यानंतर तलाव सर्वांसाठी खुले होणार आहे. आतापर्यंत झालेल्या कामापैकी १ कोटी ७० लाख रुपये संबंधित ठेकेदाराला अदा झाले असून ठेकेदार अधिकारी व नियुक्त एजन्सीच्या मार्गदर्शनाखाली गतीने काम करीत आहे. महिनाभरात जरी काम पूर्ण झाले तर लावले जाणारे गवत व अन्य बाबींचा विचार करता पावसाळ्यानंतर खर्या अर्थाने तलावाचे सौंदर्य आणखी खुलणार आहे.www.konkantoday.com