दापोली शहरातून वाहणार्या जोग नदीत कचरा न टाकण्याचे आवाहन करूनही नदीत प्लास्टिक व इतर कचरा
दापोली शहरातून वाहणार्या जोग नदीत कचरा न टाकण्याचे आवाहन करूनही नदीत प्लास्टिक व इतर कचरा टाकला जात आहे. नगरपंचायतीकडून किनार्याची वेळोवेळी साफसफाई करण्यात आल्यानंतरही दोन दिवसात कचरा दिसून येत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.जोग नदीकिनारी प्लास्टिक व इतर कचरा जोगनदीत टाकला जात असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. हाच कचरा पावसाळ्यात वाहत समुद्रात जावून सागरी जीव धोक्यात येतात किंवा नदीत अडकून राहिल्यास पाण्याची पातळी वाढून शहरात पाणी घुसून आपत्ती ओढवते. याबाबत दापोली नगरपंचायतीकडे संपर्क साधला असता काही दिवसांपूर्वी जोग नदी साफसफाई करण्यात आली होती. परंतु साफसफाईनंतर लगेच नागरिक पुन्हा कचरा टाकत आहेत. जोग नदीत कचरा टाकू नये, असे आवाहन करून देखील नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे.www.konkantoday.com