जनावरांना ईअर टॅगिंग बंधनकारक करण्याचा पशुसंवर्धन विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय
* जनावरांना ईअर टॅगिंग बंधनकारक करण्याचा पशुसंवर्धन विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, त्याची अंमलबजावणी शनिवार (दि. 1) पासून सुरू होणार आहे. ईअर टॅगिंग, तसेच भारत पशुधन प्रणालीवर नोंद या गोष्टींमुळे जनावरांची खरेदी-विक्री, तसेच सर्वच प्रकरणातील शासकीय मदत, वाहतूक, बैलगाडा शर्यतीतील बैलांचा सहभाग यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागातर्फे जनावरांना ईअर टॅगिंग करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.भारत पशुधन प्रणालीवर नोंद आणि ईअर टॅगिंग असल्याशिवाय एक जून 2024 नंतर कोणत्याही जनावरांची राज्यात खरेदी-विक्री करता येणार नाही. राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने हा निर्णय घेतला आहे. दि. 31 मार्चपर्यंत टॅगिंग बंधनकारक करण्यात आले होते. त्याची मुदत वाढवून दि.31 मेपर्यंत करण्यात आली. विशेष म्हणजे टॅगिंग असल्याशिवाय सरकारच्या पशुवैद्यकीय संस्था, दवाखान्यांमधून मिळणाच्या सेवाही बंद केल्या जाणार आहेत. www.konkantoday.com