
आरजू विरोधात आतापर्यंत १७५ जणांच्या तक्रारी गुंतवणुकदारांची कोट्यावधीची फसवणूक
आरजू टेक्सोल कंपनीचा फंडा निर्माण करण्यासाठी येथील मिरजोळे एमआयडीसीत एका हॉटेलमध्ये कामाला असलेल्या अनी नामक व्यक्तीने इतर संचालकांच्या डोक्यात घातले. शेफ म्हणून काम करत असताना कंपनीचे इतर संशयित त्याच्या संपर्कात येताच त्याने हा गुंतवणुकीचा फंडा रचला आणि आरजू टेक्सोल कंपनी स्थापन झाल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. आतापर्यंत या फसवणूक प्रकरणात पावणे दोनशेच्या घरात तक्रारी आल्या आहेत.रत्नागिरीतील गुंतवणुकदारांना चुना लावणार्या आरजू टेक्सोल कंपनीकडून आतापर्यंत दीड कोटीच्या वर फसवणुकीचा आकडा समोर आलेला आहे. या गुन्ह्याच्या पुढील तपासाच्या दृष्टीने पोलिसांनी ऑफिस ट्रेनिंग सेंटर व गोदाम सील केले आहेत. कंपनीकडे सुमारे ४० ते ५० लाखाच्या मशीनसह कच्चा व पक्का असा ४ कोटींचा माल गोदामामध्ये पडून असल्याचे बोलले जात आहे. रत्नागिरीतील सर्व मालमत्ता या कंपनीने भाड्याने घेतलेली होती. त्याशिवाय कंपनीचे वैयक्तिक मोठी मालमत्ता नसल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे. www.konkantoday.com