
रत्नागिरी शहरात काेराेना रुग्णांची संख्या वाढू लागली
रत्नागिरी जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढत असतानाच रत्नागिरी शहरातही काेराेना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे अनेकांना प्रवासाची हिस्ट्री नसल्याने कम्युनिटी स्प्रेडची शक्यता वाटत आहे जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही तशी शक्यता वर्तवली होती त्यामुळेच लाॅकडाऊनच्या निर्णयाची अंमलबजावणी झाली यामुळे आता यापुढे नागरिकांनी प्रशासनाने सुचवलेले नियम व मास्क सॅनिटायझर व सुरक्षित अंतर आदी नियम स्वताहून काटेकोरपणे पाळणे जरुरीचे आहे काल जाहीर झालेल्या अहवालात रत्नागिरीतील सतरा जणांचा समावेश असून त्यामधील आठ जण हे विशेष कारागृहातील कैदी आहेत तर दोन जण कारागृह पोलीस आहेत महाराष्ट्रात इतर ठिकाणी कारागृहात कोरोना पसरला असताना रत्नागिरी कारागृह त्यापासून लांब होते मात्र काही दिवसांपूर्वी एका कारागृह पोलिसाचा कोरोना पॉझेटिव्ह आला त्यानंतर आता जेलमधील कैद्यांना काेराेनाची लागण झाल्याने कारागृह प्रशासनाची चिंता वाढली आहे काल आलेल्या अहवालामध्ये एका खासगी डॉक्टरचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे अर्थचक्र बंद होऊ नयेत यासाठी अनेक कारखान्यांना सुरू ठेवण्यास शासनाने परवानगी दिली आहे परंतु लोटे एमआयडीसीतील घरडा केमिकल सारख्या कंपनीत कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने दक्षता घेणे जरूरीचे बनले आहे तसेच जिल्ह्याच्या इतर तालुक्यात सापडणारी रुग्णांची संख्या पाहता प्रशासनाबरोबर नागरिकांनी स्वतः ही जबाबदारी ओळखून दक्षता घेणे आवश्यकता आहे
www.konkantoday.com