
शरद पवार यांचा ८० व्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेनं शरद पवार यांच्या कामांचा आणि स्वभावाचा उल्लेख करत स्तुतीसुमनं उधळली
आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा ८० वा वाढदिवस आहे. यानिमित्तानं शिवसेनेनं शरद पवार यांच्या कामांचा आणि स्वभावाचा उल्लेख करत स्तुतीसुमनं उधळली आहेत. ८०वर्षांचे होऊनही शरद पवार यांचे वय वाढलेच नाही असा त्यांचा उत्साह आजही दिसतोय. खऱ्या अर्थाने लोकप्रिय, संघटना कुशल, राज्याचे व देशाचे प्रश्न उत्तम तऱ्हेने जपणाऱ्या, मोदींपासून क्लिंटनपर्यंत संबंध ठेवणाऱ्या, सुस्वभावी, स्नेह आणि शब्द जपणाऱ्या, हत्तीची चाल आणि वजिराचा रुबाब असलेल्या शरद पवार यांचे पुढील आयुष्य हे गंगा-यमुनेची विशालता आणि हिमालयाची उत्तुंगता गाठणारे होवो, अशा शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत. ‘ठाकरे सरकार’ ही शरद पवारांची अलीकडच्या काळातील सगळ्यात मोठी बेरीज असल्याचंही शिवसेनेनं म्हटलं आहे.
www.konkantoday.com