मान्सूनचे आगमन होणार असल्याने १ जूनपासून मासेमारी हंगाम संपुष्टात
मान्सूनचे आगमन होणार असल्याने १ जूनपासून मासेमारी हंगाम संपुष्टात येणार आहे. त्यामुळे राजापूर तालुक्यातील साखरीनाटे बंदरावर सध्या मच्छिमारी बोट बंदरावर सुरक्षित ठिकाणी आणण्यासाठी मच्छिमारांची लगबग सुरू आहे. दरम्यान यावर्षीचा मच्छिमारी हंगाम मच्छीमारांसाठी फारसा फायदेशीर नव्हता, असे मत साखरीनाटेतील मच्छिमार नेते अमजद बोरकर यांनी सांगितले. सुमारे पाच हजार लोकसंख्या असलेले राजापूर तालुक्यातील साखरीनाटे बंदर हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक मोठे बंदर म्हणून ओळखले जाते. पर्ससीन नेट, फिशिंग ट्रॉलर, यांत्रिकी होड्या, बिगर यांत्रिकी होड्या अशा तीनशेहून अधिक मच्छीमारी नौका या बंदरात मच्छिमारी करतात. मच्छिमारी व्यवसायासाठी कर्नाटक नेपाळ, उत्तर प्रदेश, बिहार, उडीसा आदी भागातून हजारो कामगार साखरीनाटे येथे दरवर्षी येत असतात. या मच्छिमारी व्यवसायातून दरवर्षी कोट्यावधींची उलाढाल साखरीनाटे बंदरातून होत असते. www.konkantoday.com